माणुसकी,बाबांकडून शिकलेला दुसरा धडा. मी मुळातच रागीट स्वभावाची अर्थात तो गुण ही बाबांकडूनच मिळाला पण आमच्या रागात फारच अंतर. असो. बाबा जरी रागीट असले तरी अतिशय प्रेमळ व्यक्ती. कधी कुणाला उगीच रागावून बोले नाहीत. म्हणायचे जर प्रेमाने सांगून गोष्ट होत नसेल तरच रागाचा शास्त्र उचलावा. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हसतमुख परत पाठवत. त्यांच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेम चा सोलुशन असे. माणसाचा जन्म मिळाला आणि त्यांनी तो पुरेपूर जगला. प्रत्येकाला प्रेम दिला, आधार दिला, मायेची उब दिली, अनेकांना आपल्या पंखांखाली स्थान दिला. मग त्या व्यक्ती ची जात, प्रांत, भाषा पहिली नाहीच त्यांनी. अशीच माणसं जोडत गेले. मला कधी कधी त्यांच्या संयमाचा कौतुक वाटे. अनेकदा मी त्यांना एका वेड्या माणसं सोबत ही बोलताना पाहिलंय. एरिया मधील सुतारकाम तो करीत असे पण अनेकदा त्याला वेडेपणाचे झटके येत,  कधीतरी रस्त्याने धावत सुटे, कधी शिवीगाळ करत  पण बाबांशी मात्र तो शिस्तीत बोले. नवल वाटावा असा त्याच्याशी बाबांचा संभाषण होत. बाबा म्हणत कि अस्या माणसांना आपण वाळीत टाकून चालत नाही आपण त्यांच्या समस्या जाणून घेणे  गरजेचे आहे. कधीतरी ते त्या व्यक्तीस  जेवायला नेत तर कधी  खर्चासाठी  पैसे देत. ते जितके प्रेमळ माणसांची तितकेच प्राण्यांसाठी ही त्यांच्या मनात माया. त्यांनी माणुसकी खऱ्या अर्थाने जपली आणि जगली .

Another important lesson that I learnt from my father is that of humanity. I learnt from him what #BeingHuman truly means. Being short tempered understanding this lesson was vital to me. Of course my trait of being short tempered comes from my father but his temper had a unique discipline. He’d say, “Use your anger only if kind words don’t work.” People who came to him with their problems went back with a smile. He had a solution to all the problems. He never differentiated a person basis his caste, language, religion or region. His was a language of love and humanity. He helped many and took many under his wings. The warmth of his love and teachings helped many grow, flourish and spread their wings. His patience is praiseworthy. I have seen his compassion for even those who are neglected by the society. I recall, how he would talk to a mentally deranged person living in our vicinity. That man would often do petty carpentmary work to earn his living but most of the times he would talk gibberish and swear at passersby. But the way he would talk at length with my father on multiple issues is laudable. Baba would often buy him food, enquire about his issues and give him money. He showed humanity not only towards humans but gave his love to animals as well. He lived humanity to the fullest.