भारतामध्ये वाढत चाललेला इंटरनेट तसेच सोशल मीडियाचा वापर पाहता सध्या व्यवहार आणि व्यापार हा डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होताना दिसतं आहे. महिन्याच्या 200-250 नेट रिचार्जने तुम्हाला जर हजारो रुपयांचा फायदा होणार असेल तर या सोशल मीडिया मार्केटिंगचा गंभीर्याने विचार होणे काळाची गरज आहे. अशावेळी सोशल मीडिया हा केवळ टाईमपास म्हणून न पाहता व्यापाराच्या दृष्टीने विचार करणाऱ्या युवावर्गाला योग्य आणि सटीक मार्गदर्शनाची गरज आहे. लेखक आशिष चोप्रा यांनी आपल्या “फास्ट चीप अँड व्हायरल” या पुस्तकाच्या माध्यमातून अत्यल्प खर्चात उत्कृष्ट मार्केटिंग आणि ब्रँडिंग कसे करावे यासाठी स्वानुभव वापरून अतिशय सोप्या शब्दात मार्गदर्शन केले आहे.

सदर पुस्तकं वाचताना सहज लक्षात येते लेखक आशिष चोप्रा यांनी बदलती समाजमाध्यमं आणि ते वापरणाऱ्या जनतेची मानसिकता याचा इतका बारकाईने विचार केला आहे कीं वाचक आपसूकच लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीवर विचार मंथन करण्यास प्रेरित होतो.

सोशल मीडियाचा वापर करताना आता जवळपास सर्वाना “कंटेंट” अर्थात आशयच महत्व कळू लागले आहे पण ते कंटेंट कोणत्या स्वरूपाचे असावे, विषय कोणते निवडावे, वितरणाची माध्यमं कोणती आणि कशी वापरावी इत्यादी संबंधित विषयांचे ज्ञान नसल्याने अनेकांना अपेक्षित यश मिळत नाही. म्हणूनच लेखक आशिष चोप्रा यांनी पुस्तकात अनेक गुपितं उलघडली आहेत. “शेअर करण्या योग्य निर्मित” या त्याच्या एका वाक्यातच पुस्तकाचा मुख्य गाभा दडला आहे. स्वतःच्या प्रॉडक्टची ब्रँडिंग करण्याआधी ग्राहकांच्या समाधानाचा विचार करण्याचा बहुमूल्य सल्ला आशिष चोप्रासारखी तज्ञ व्यक्तीच देऊ शकते.

पुस्तकाची एक खास विशेषतः म्हणजे लेखक पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहेत असे प्रत्येक वाचकाला जाणवल्या शिवाय राहणार नाही तसेच हायलाईट केलेला प्रत्येक मुद्दा पुस्तक वाचून झाल्यावरही आपल्याला विचार करण्यास भाग पडतो.
नोकरची असुरक्षितता असणाऱ्या प्रत्येक युवकाने हे पुस्तक नक्कीच वाचावे. कारण मला खात्री आहे की पुस्तक वाचल्यावर वाचक स्वतःसाठी आखलेल्या चौकटीबाहेर जाऊन काही नावीन्यपूर्ण करण्यासाठी योग्य दिशेने नक्कीच वाटचाल करेल….

Read the English translation of the review 👇

Internet and social media is used extensively in India. For day-to-day operations and businesses understanding of digital marketing is imperative. If a chota recharge of 200 gives you the returns in thousands or maybe more then in my view digital marketing needs to be taken very seriously. Social media is no more a mere timepass and hence one needs correct guidance to ace this ginormous universe. Author Ashish Chopra in his book, “Fast cheap & viral” has presented how to best utilize social media at an affordable cost for topnotch branding and marketing. He has used his experience to disseminate this information.

The book is a fruition of extreme research. The author has presented the ideas from point of view of the current and coming generations. He has analysed the changing phases of media from Newspaper, Radio, TV to the emergence of the social media. He has penned this book keeping in mind the work life and the thinking of the social media users.

“Content is the king,” goes the adage but not many are aware how to utilize this “content” to derive business. Specifically –

• How should the content be structured?
• What topics should you pick?
• Which media is the best to disseminate the information?
• How should you disseminate the information? 

And so for the benefit of the readers and social media users, author reveals some yet unheard of secrets about the various social medias.

“Creating shareable content” forms the crux of this book. Before ensuing the branding of the product it is important to understand the mindset of your consumers – this essential nugget of wisdom comes from the expertise of author Ashish Chopra.

One key highlight of this book is that it feels like the author is having a one-on-one discussion with you. Alongside the key takeaways presented in every chapter make us ponder long after we have closed the book.

Last word – Considering that job security is zilch these days. (And there are millions out there worrying about losing their jobs, especially after pandemic hit us.) Reading this book and learning from it becomes necessary. This book gives you a step-by-step approach to become a social media hustler and self-reliant at that. 

To buy this book, pls click – https://amzn.to/3vx3kXH

**Copyright in content and pictures belongs to Siddhi Palande, the owner of this blog, and cannot be republished or repurposed without permission from the author. Infringement of any kind will invite strict legal action.**